गुडघ्यांचे दुखणे

सध्या सगळ्यांना विशेषतः स्त्रियांना गुडघेदुखी जास्त होते आहे असं दिसत आहे.
काय कारणं असतील ?

१) चुकीचे स्निग्ध पदार्थ खाणे
तिळाचं तेल, खोबरेल तेल, राईचं तेल , शेंगदाणा तेल, तूप , लोणी खोबरं हे चांगले स्निग्ध पदार्थ आहेत. ते योग्य प्रमाणात खाण्याने गुडघ्यांमधील वंगण नीट रहाते.
चीज , butter , meonese , Palm तेल , Refined oils हे चुकीचे स्निग्ध पदार्थ आहेत. हे तुमचं खराब cholesterol व वजन वाढवतात किंवा शरीरात अति कोरडेपणा आणतात.

२)चुकीचा व्यायाम
आपण जर सतत चालत फिरत किंवा उभ्याने काम करणारे असू तर आपल्याला बैठा व्यायाम , योगासने यांची गरज असते.
जर जीवनशैली अधिक बैठी असेल तर चालण्याचा व्यायाम किंवा Gym मधील व्यायाम करावा.
अनावश्यक खूप चालणे किंवा कंबर / गुडघ्यांचे दुखणे असताना जास्त चालण्याने सांधे अधिक दुखतात , सुजतात , झिजतात

३) वाढलेलं वजन
अनेक कारणांमुळे वजन वाढू शकतं. जसं चुकीचा आहार , आजाराचे परिणाम , औषधांचा दुष्परिणाम, मानसिक अस्थैर्य, Harmones चा प्रभाव.
नेमकं कारण शोधून त्यानुसार उपाय करणं गरजेचं आहे. कोणाचं तरी ऐकून काहीतरी diet केल्याने जीवनसत्त्वांचा अभाव होऊन फक्त गुडघ्यांचीच नाही तर संपूर्ण शरीराची वाट लागते.

४) पुरेशी विश्रांती न घेणे
शरीराची झीज भरून निघण्यासाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात झोप घेणेही आवश्यक आहे. रात्री झोपायला उशीर होत असेल तर अट्टाहासाने सकाळी लवकर उठून व्यायाम करणे टाळा. जी कामं बसून करणं शक्य आहे ती बसून करा. सतत उभे राहू नका. गुडघे दुखत असतील तर जिने चढू नका.

५)अभ्यंगाचा अभाव
आपल्या शरीराला विशेषतः सांध्यांना तेल लावणं खूप आवश्यक आहे. जसं मशीन्समध्ये आपण तेल घालतो तसं सांधे कुरकुरू नयेत म्हणून त्यांना तेल लावावं. अंथरूण खराब झालं तरी चालेल पण सांधे चांगले ठेवा. अंथरूण नवीन आणता येतं.

६)पचनक्षमतेप्रमाणे आहार हवा
जे पचेल ते जेवढं पचेल तेच खा. अजीर्णामुळे तयार झालेला ‘आम ‘ सांध्यांना त्रासदायक आहे.

गुडघेदुखी टाळता येईल आणि झालीच तर चुका सुधारून बरी करता येईल. फक्त सल्ला योग्य घ्या.

वैद्या चंदाराणी बिराजदार
MD

वैद्या चंदाराणी बिराजदार
MD

0
Your Cart is empty!

It looks like you haven't added any items to your cart yet.

Browse Products