Acidity – मुंबई मध्ये असणारा common problem.

कारणं
👉🏻अनियमित जीवनशैली
👉🏻खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी
👉🏻व्यायामाचा अभाव
👉🏻अपुरी किंवा चुकीच्या वेळेची झोप
👉🏻 मानसिक तणाव

उपाय काय ?
👉🏻 जीवनशैली सुधारा. लवकर झोपा लवकर उठा.
👉🏻 खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपण आजारांना आमंत्रण देत रहातो. कोणीतरी सांगितलेलं कुठेतरी ऐकलेलं( म्हणजे आजकाल mobile वर🙄) diet करू नका. तुमच्या शरीराला काय आवश्यक आहे ते बघा. नसेल समजत तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. केवळ चविष्ट लागतं म्हणून खाऊ नका. खाताना या पदार्थाचा माझ्या शरीराला काय फायदा तोटा होऊ शकतो याचा २ मिनिटे विचार करा.
दोन खाण्यांमध्ये ३-४ तासांचा अवधी ठेवा आणि दिवसा दोन खाण्यांमध्ये ६ तासांपेक्षा जास्त वेळ असू देऊ नका.
👉🏻 प्रत्येकाच्या शरीराला व्यायाम आवश्यकच आहे. प्रमाण कमी अधिक असू शकतं. काहीही करायला झेपत नसेल तरी प्रत्येक खाण्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला.
जेवणानंतर जास्त चालू नका.तेही त्रासदायक आहे.
👉🏻शरीराची झीज भरून निघण्यासाठी आणि अन्नाचे पूर्ण पचन होण्यासाठी पुरेशी आणि योग्य वेळेची झोप आवश्यक आहे. झोप पूर्ण झाली तरच पोटही साफ होते आणि अनेक आजार टळतात.
👉🏻 मानसिक तणावाची अनेक कारणे असू शकतात. वैयक्तिक , कौटुंबिक व व्यावसायिक गोष्टी त्यास कारणीभूत असतात. यावर मात करण्यासाठी स्वतःला चांगल्या कामांत व चांगल्या विचारांमध्ये गुंतवा. नवीन काहीतरी बनवत रहा. छंद जोपासा.
सध्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे mobile चा कमीत कमी व आवश्यक तेवढाच वापर करा. सतत Social media वर active असण्याची गरज नाही. त्यामुळेही तणाव निर्माण होतो.स्वतःचे आणि दुसऱ्याचेही खाजगीपण जपा.
स्वतःच्या आजारांवर डॉक्टरांशी चर्चा करा. Mobile वरून मिळालेल्या माहितीमुळे घाबरून स्वतःचे मानसिक स्वास्थ्य घालवू नका.
चिता मेल्यावर जाळते व चिंता जिवंतपणी! आपण चिंता निर्माण करून घेतो ज्यामुळे Acidity निर्माण होते.

Acidity हे अनेक आजारांमध्ये एखादे लक्षणस्वरूप असते तर दुसऱ्या काही आजारांचे कारणही ठरू शकते. म्हणून त्यावर योग्य तो उपाय अत्यावश्यक आहे. औषधोपचार, पंचकर्म( विरेचन) , शिरोधारा , ध्यान इत्यादी उपायांनी Acidity वर उपचार करणे गरजेचे आहे.

वैद्या चंदाराणी बिराजदार
MD

0
Your Cart is empty!

It looks like you haven't added any items to your cart yet.

Browse Products