पोटात गॅस? constipation? वारंवार अजीर्ण?
पुढील गोष्टी टाळा
* खूप जास्त सुकं खाणं
* कच्चे पदार्थ खूप खाणं
* Fatless oils वापरणं
* जेवणानंतर जास्त वेळ चालणं
* जेवणानंतर लगेच बसून रहाणं
* सूर्यास्तानंतर दूध व दुग्धजन्य पदार्थ खाणे
* कमोडचा वापर
सुकं खाणं का टाळावं ?
सुक्या खाण्यामध्ये आपण काय खातो?
टोस्ट बिस्किट, कुरमुरे, शेव, चिवडा खाकरा वगैरे फरसाण
सुके पदार्थ पोटात वायु आणि पित्त वाढवतात. टोस्ट , खाकरा हलके वाटले तरी त्यात Palm तेल , कपासीचं तेल वापरतात ज्यामुळे ते Crispy आणि हलके होतात. आणि हलके असल्यामुळे अधिक प्रमाणात खाल्ले जातात.
दुसरा Option नसेल तरच हे पदार्थ खा. पोटभरीला नको. चिवडा चकली शक्यतो जेवणासोबत किंवा पोहे उपमा यांच्यासोबत खा.
संध्याकाळच्या Snacks Time साठी ताजी फळं घरी बनवलेले लाडू / वड्या/ चिक्की, भाज्यांचं सूप + नाचणीचं पीठ/ शिजवून वाटलेले मूग / सत्तू असे पदार्थ निवडू शकता
क्रमशः
वैद्या चंदाराणी बिराजदार
MDO