कच्चे पदार्थ खूप खाल्ले तर काय होईल ?

माणसाच्या पोटाची रचना आता खूप कच्चं अन्न पचवण्याची राहिलेली नाही. फळं जी पिकून मऊ झालेली असतात ती आपण सहज पचवू शकतो , पण
*फक्त भिजवून मोड आलेली कडधान्ये
* वाडगाभर कापलेली Salads
असे पदार्थ आपल्या पचनशक्तीवर ताण पाडतात. ज्यांना आधीच अजीर्णाचा त्रास आहे त्यांची liver ची कार्यक्षमता कमी झालेली असते. पचनक्रिया मंद असते. त्यांना तर हमखास या गोष्टींनी त्रास होतोच.

वजन कमी करण्यासाठी कच्ची salads खाऊन एक वेळचे पोट भरण्याचा प्रयोग खूप जण करतात पण ज्यांचा अग्नि मंद असतो त्यांचेच वजन वाढलेले असते. खूप खाऊन ते पचवू शकणाऱ्यांचे वजन वाढत नाही.हे लक्षात घ्या.

अन्नामधील बहुतांश Vitamins ही Fat Soluble असतात. Proteins ना पचण्यासाठी सोबत Carbohydrates Fats हवे असतात. आपण कच्चे अन्न खाल्ले तर त्याचा फक्त चोथा शरीराला उपयोगी ठरतो पण त्यातील Vitamins , Proteins शरीरात शोषले जात नाही. उलट या न पचलेल्या अन्नामुळे पोटात गॕस धरतो. पोट फुगते. LiverKidneys वरचा ताण वाढतो.

मग कच्चं काही खायचंच नाही का ?
खायचं , पण प्रमाणात ! नेहमी नैवेद्याचं ताट लक्षात ठेवावं. त्यात कोशिंबीर किती असते ? एक ते दोन Table Spoon. एवढंच कच्चं खायचं . तेही शेंगदाण्याचं कूट , खोबरं किंवा जरासं दही मिसळून. जमलं तर तुपात हिंग जिरे घालून फोडणी द्या. अजूनच चांगलं .अथवा लोखंडाच्या कढईत तुपात हिंग जिर्याची फोडणी करुन किसलेली Salads, मोड आलेली कडधान्ये घालावीत. झाकण ठेऊन गॕस बंद करावा. याप्रकारे खाल्लेल्या कोशिंबिरी या Fibres ची गरजही पूर्ण करतात व Vitamins ही मिळतात. Salad कच्ची खाण्यातला अजून एक धोका म्हणजे त्यात सूक्ष्म जंत असू शकतात. जे पोटात जाऊन वेगवेगळे आजार उत्पन्न करतात , जसे Ulcers , मल मूत्रावरील ताबा जाणे, Vaginal Infections, White Discharge, खोकला सर्दी, त्वचाविकार. क्वचित् मेंदू व हृदयाचा संसर्ग होऊ शकतो. वारंवार बाहेर Sandwich खाणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा की त्या भाज्या ना नीट धुतलेल्या असतात की वाफलेल्या.

लग्नसमारंभात तर खूप सोसाने Salads घेणारे मी पाहिले आहेत. त्यांना असं वाटतं की ही Salads खाल्ली की पुढे जे Unhealthy पदार्थ मी खाणार त्यांचा त्रास कमी होईल. पण तिथेही ही Salads स्वच्छ धुतलेली किंवा हाताळलेली नसतात. खूप वेळापासून कापून उघडी ठेवल्याने त्यावर बाहेरुनही जंतू बसलेले असतात. त्यामुळे यापुढे सणासमारंभात कच्ची Salads खायची की नाही हे तुम्हीच ठरवा.

क्रमशः

वैद्या चंदाराणी बिराजदार
MD

0
Your Cart is empty!

It looks like you haven't added any items to your cart yet.

Browse Products